असोसिएट सर्वे ऑफिसर/सर्वे ऑफिसर - महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 सप्टेंबर 2024
स्थान आणि कार्य पद्धती: महाराष्ट्रात कुठेही (वर्क फ्रॉम होम) आणि पुणे येथील आमच्या कार्यालयात ठरवलेल्या वेळी मीटिंगसाठी येणे गरजेचे असेल.
पगार श्रेणी: रु. 18,000 ते रु. 24,000 प्रति महिना, कौशल्ये आणि अनुभवावर आधारित दिलेल्या पदानुसार.
कराराची कालावधी: सुरुवातीला एक वर्षाचा करार (कामगिरी आणि संस्थेच्या गरजेनुसार करार वाढवला जाऊ शकतो.
सुविता विषयी:
सुविता ही एक ना-नफा तत्त्वावर चालणारी स्टार्टअप (NGO) आहे जी भारतातील लहान बाळांच्या लसीकरणाच्या दरात सुधारणा करण्यासाठी काम करते. आमचे उपक्रम अजून प्रभावशाली बनवणे आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे हे आमच्या संस्थेचे मुख्य लक्ष्य आहे. अधिकाधीक पालकांनी त्यांच्या बाळाचे लसीकरण करावे ह्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत मिळून २ उपक्रम राबवतो. सुविताचे दोन्ही उपक्रम एका प्रतिष्ठित रिसर्च संस्थेच्या संशोधनावर आधारित आहेत
-
SMS रिमाइंडर प्रोग्रॅम: लहान बाळांच्या पालकांना त्यांच्या बाळाच्या लसीकरणाची आठवण करून देण्यासाठी SMSद्वारे रिमाइंडर पाठवणे.
-
अम्बॅसेडर प्रोग्रॅम: गावातील सामाजिक रित्या सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना ओळखून त्यांना 'लसीकरण दूत' म्हणून लसीकरण आणि आरोग्य सेवांबद्दल गावातील लोकांना जागृत करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
असोसिएट सर्वे ऑफिसर/सर्वे ऑफिसर पदाबद्दल माहिती:
सर्वे ऑफिसरला पुढील सर्वेक्षणे चांगल्या गुणवत्तेने करणे अपेक्षित आहे: आमचे उपक्रम अपेक्षेप्रमाणे चालू आहेत याची खात्री करण्यासाठी मूल्यमापन सर्वेक्षणे (M&E surveys); आमच्या उपक्रमाशी जोडले गेलेल्या पालकांबद्दल आणि त्यांच्या गरजा व प्राधान्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संशोधनात्मक सर्वेक्षणे; आणि अम्बॅसेडर कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘लसीकरण दूतांना’ शोधण्यासाठी आणि भरती करण्यासाठी नामांकन आणि भरती सर्वेक्षणे.
आम्ही खालील पदांसाठी १० जणांची भरती करणार आहोत:
-
असोसिएट सर्वे ऑफिसर: ही प्रवेश-स्तराची भूमिका सर्वेक्षण, डेटा कलेक्शन, किंवा विविध समुदायांसोबत काम करणे यामध्ये आपले करिअर सुरू करत असलेल्या उमेदवारांसाठी योग्य आहे.
-
सर्वे ऑफिसर: ही भूमिका अधिक अनुभवी उमेदवारांसाठी आहे ज्यांनी सर्वेक्षण करणे, डेटा क्वालिटी सुनिश्चित करणे या कौशल्यांमध्ये प्राविण्य सिद्ध केले आहे.
मुख्य जबाबदाऱ्या:
-
सुविताच्या कार्यक्रमाच्या गरजांनुसार फील्ड मुलाखती आणि सर्वेक्षणे करणे, यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
-
सुविताच्या नियमांनुसार फील्डमध्ये मुलाखती घेणे.
-
निर्देशानुसार मुलाखतीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचे ट्रान्सक्रिप्शन करणे.
-
-
सुविताच्या अम्बॅसेडर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तसेच कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी नियमित फोन सर्वेक्षणे करणे.
-
सुविताच्या SMS रिमाइंडर कार्यक्रमासाठी आवश्यक डेटा कलेक्शन आणि डेटा एंट्री प्रक्रियांमध्ये मदत करणे.
-
उपक्रम अपेक्षेप्रमाणे चालू आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी आणि तसेच उपक्रमाच्या मूल्यमापनासाठी नियमित सर्वेक्षणे करणे.
-
निर्देशानुसार सर्वेक्षण डेटा Excel/Google Sheets मध्ये एंट्री करणे.
-
-
आपल्या व्यवस्थापकास सर्वेक्षण प्रगतीवर नियमित फीडबॅक आणि सविस्तर अहवाल प्रदान करणे.
कृपया लक्षात घ्या की कराराच्या कालावधीत या भूमिका आणि जबाबदाऱ्या वेळोवेळी पुनरावलोकन केल्या जाऊ शकतात.
ही एक उत्तम संधी का आहे?
-
तुम्ही एका ध्येयाने प्रेरित, प्रभाव-केंद्रित संस्थेचा भाग होणार आहात, जी संशोधनावर आधारित उपक्रम राबवते
-
आम्ही एक मजबूत मूल्यांवर आधारित असलेली संस्था आहोत जिथे प्रत्येकजण एकाच लक्ष्यासाठी काम करत आहे.
आम्ही कोणाला शोधत आहोत?
-
आमच्या मिशनसाठी उत्साही: तुम्ही सुविताच्या मिशन आणि कामाच्या प्रभावाबद्दल निष्ठावंत व उत्साही आहात आणि आमच्या उपक्रमाशी जोडलेल्या पालकांना त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यात सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी प्रेरित आहात.
-
स्वयं-प्रेरित आणि आयोजित: तुम्ही कमीत कमी पर्यवेक्षणासह आपल्या दिनचर्येचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने करू शकता, जेणेकरून कार्ये वेळेवर आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण होतील.
-
संवेदनशील आणि व्यावसायिक: तुम्ही सर्वेक्षक म्हणून संवेदनशील माहिती हाताळताना गोपिनीयता, विवेक आणि कौशल्य दाखवता.
-
अनुभव: सर्वेक्षक म्हणून दोन वर्षांचा अनुभव असणे एक प्लस आहे, परंतु हे कठोरपणे आवश्यक नाही.
-
तंत्रज्ञानाची साक्षरता: तुम्ही स्प्रेडशीट, गूगल डॉक्स, ईमेल्स, कॅलेंडर, आणि घरून काम करण्यासाठी लागणारी तंत्रज्ञानाची साधने यांसारख्या कार्यांसाठी संगणकाचा वापर करण्यास पूर्णपणे सक्षम आहात.
-
भाषा कौशल्य: तुमच्याकडे मराठीत उत्कृष्ट बोलण्याचे आणि लेखनाचे कौशल्य आहे. जर तुमच्याकडे हिंदी आणि इंग्रजीच्या मूलभूत संभाषण कौशल्य असेल तर ते विविध प्रकारच्या लोकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
-
पुण्याला भेटीसाठी येण्याची तयारी: तुम्ही आमच्या पुणे कार्यालयात टीम मीटिंग्ससाठी आणि फील्ड व्हिजिट्ससाठी वेळोवेळी येण्यास तयार आहात. तुम्हाला पुण्यात 2-3 आठवड्यांच्या कालावधीत प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असेल.
इतर तपशील:
-
कामाची वेळ: पूर्ण वेळ, सोम-शुक्र
-
वेतन श्रेणी: रु 18,000 ते रु 24,000 प्रति महिना, अनुभव आणि पात्रतेच्या अनुषंगाने.
आम्ही आमची वेतन संरचना स्पर्धात्मक, न्याय्य आणि आमच्या संघटनेच्या मूल्ये आणि उद्दिष्टे यांच्याशी सुसंगत असतील याची खात्री करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या टीमला त्यांच्या पगाराची संरचना कशी आहे आणि ती संरचना बाकीच्या संस्थांच्या तुलनेत आहेत कशी आहे हे समजून घेण्यासाठी खुलेपणा राखतो.
फायदे:
-
दरवर्षी 35 दिवसांचा पूर्ण पगारासह सुट्टीसाठी सशुल्क रजा आणि 12 दिवसांची आजारपणाची रजा.
-
सर्व भारतात राहणाऱ्या टीम सदस्यांसाठी आरोग्य विमा धोरण.
स्थान: महाराष्ट्रातून हायब्रिड-रिमोट आणि आमच्या पुण्यातील कार्यालयात वेळोवेळी नियोजित भेटी
तुमचा व्यवस्थापक: प्रोग्रॅम कोऑर्डिनटोर/ प्रोग्रॅम डिलिव्हरी मॅनेजर
अर्ज:
आम्ही मान्य करतो की जात, वर्ग, धर्म, लिंग, आणि लैंगिकता अनेकदा भारतातील आमच्या कार्यक्रमांच्या वापरकर्त्यांच्या आरोग्य प्रणालीशी संवादावर प्रभाव टाकतात. आम्ही काम करत असलेल्या समुदायांची चांगले समज घेण्यासाठी, आम्ही विविध जाती, धर्म, लिंग, आणि लैंगिकतेमधून, विशेषत: वंचित पार्श्वभूमीच्या व्यक्तींना अर्ज करण्यास प्रोत्साहन देतो.
आम्ही सर्वांना समान संधी देण्यात विश्वास ठेवतो. नियुक्ती, पगार, प्रशिक्षण, कामगिरी मूल्यांकन, आणि करार रद्द करणे हे सर्व निर्णय न्याय्य आणि पक्षपातीपणावाचून होतात. आम्हाला आमच्या टीम मध्ये विविधता वाढवण्यास आवडेल, कारण आम्हाला विश्वास आहे की विविध दृष्टिकोन आणि अनुभवांमुळे टीमला फायदा होतो.
आमचे धोरण स्पष्ट आहे: वय, अपंगत्व, लिंग, वंश, धर्म किंवा विश्वास, लिंग बदल, लग्न किंवा नागरी भागीदारी, गर्भधारणा किंवा मातृत्व, किंवा लैंगिक अभिमुखता यांच्या आधारे कोणत्याही प्रकारचे भेदभाव आम्ही सहन करत नाही. आम्ही विविध उमेदवारांकडून येणाऱ्या अर्जाचे स्वागत करतो आणि विशेषत: वंचित गटांमधील व्यक्तींना अर्ज करण्यास प्रोत्साहित करतो. जर अर्ज प्रक्रियेदरम्यान तुम्हाला कोणत्याही सुविधांची आवश्यकता असल्यास, कृपया आम्हाला कळवा.
Survey Officer - Maharashtra
Application Deadline: 22nd September 2024
Location or work modality: Remote in Maharashtra, with periodic scheduled visits to our office in Pune
Salary Range: Rs 18,000 to Rs 24,000 per month depending on roles assigned based on skills & experience
Contract duration: Initially one-year contract (with the possibility of extension subject to performance and organisation’s needs)
About Suvita
Suvita is a nonprofit startup working to increase the uptake of children’s vaccinations in India. We are impact-focused and scale-focused, delivering two evidence-based programmes, in collaboration with state governments, to boost attendance at vaccination appointments.
-
Identifying natural community influencers and supporting them to act as immunisation ambassadors.
-
Sending SMS reminders directly to new parents and caregivers, to help them remember when their child is due for a vaccination.
About the role
Survey Officers specialise in conducting phone surveys for a range of purposes: monitoring and evaluation (M&E) surveys to make sure our programmes are running as intended; research surveys to help us learn more about our users and their needs and preferences; and nomination and recruitment surveys to identify and recruit immunisation ambassadors, within the ambassadors programme.
We are hiring for 10 open positions across the following roles
-
Associate Survey Officer: This entry-level role is ideal for candidates who are just beginning their careers in conducting surveys, data collection, or community engagement.
-
Survey Officer: This role is for more experienced candidates who have demonstrated skills in conducting surveys, ensuring data quality and integrity.
Key Responsibilities:
-
Carry out field interviews and surveys as per Suvita’s programmatic needs, including:
-
Interviews in the field as per Suvita’s protocols.
-
Transcription of interview audio recordings as per instructions.
-
-
Conduct routine phone surveys for the implementation of Suvita’s Ambassadors programme, as well as the monitoring and evaluation of the programme.
-
Assist with data collection and data entry activities as needed for Suvita’s SMS reminders programme.
-
Conduct routine surveys to monitor the process and effectiveness of the programme.
-
Enter the survey data into Excel/Google Sheets as per instructions.
-
-
Provide regular feedback and detailed reports on survey progress to your manager.
Please note that these roles and responsibilities may be revised periodically during the term of the contract.
Why is this a brilliant opportunity?
-
You’ll be part of a mission-driven, impact-focused organisation, delivering programmes grounded in evidence.
-
We are an org with strong values where everyone is pulling in the same direction.
Who are we looking for?
-
Passionate About Our Mission: You are deeply committed to Suvita’s mission and impact, and motivated to support our users in improving their families’ health and wellbeing.
-
Self-Motivated and Organized: You can efficiently manage your own routine with minimal supervision, ensuring tasks are completed on time and with high quality.
-
Discreet and Professional: You exercise a high level of discretion when handling potentially sensitive information as a surveyor.
-
Experience: While it’s a plus to have at least two years of prior experience as a surveyor or enumerator, it’s not a strict requirement.
-
Tech-Savvy: You are completely fluent in using a computer for tasks such as navigating spreadsheets, documents, emails, scheduling, and remote work tools.
-
Language Proficiency: You have excellent oral and written skills in Marathi. Bonus, but not a requirement if you possess basic conversational Hindi and English skills to communicate effectively with different stakeholders.
-
Willingness to Travel: You are open to travel to our Pune office periodically for team meetings and conducting field visits if needed. You will also be required to complete your initial training in Pune over a period of 2-3 weeks.
Other details
-
Hours: Full-time, Mon-Fri
-
Salary range: Salary Range: Rs 18,000 to Rs 24,000 per month, commensurate with experience and qualifications.
We strive to ensure that our pay structures are competitive, equitable, and aligned with our organisation's values and goals. We maintain openness about how salaries are structured and determined, ensuring that our team understands their compensation and how it compares to within the industry standards.
-
Benefits include:
-
35 days paid holiday leave per year plus 12 days sick leave at full pay.
-
Health insurance policy for all India-based team members.
-
-
Location: Hybrid-Remote in Maharashtra, with periodic scheduled visits to our office in Pune
-
Reports to: Programme Coordinator/ Programme Delivery Manager
Application
Finally, we recognize that caste, class, religion, gender, and sexuality frequently impact how our programmes’ users interact with the health system across India. In pursuit of a better understanding of the communities we work with, we strongly encourage applications from a diversity of castes, religions, genders, and sexualities, particularly those from marginalised backgrounds.
We are an equal opportunity employer. All decisions regarding hiring, compensation, training, performance evaluation, and termination are made fairly and without bias. We are dedicated to fostering a diverse work environment, as we believe that teams benefit from a variety of perspectives and experiences.
Our policy is unequivocal: we do not tolerate discrimination based on age, disability, sex, race, religion or belief, gender reassignment, marriage or civil partnership, pregnancy or maternity, or sexual orientation. We welcome applications from a broad range of candidates and strongly encourage individuals from underrepresented groups to apply. If you require accommodations during the application process, please let us know.